चार गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसांसह आरोपी जाळ्यात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळात रेल्वे स्थानक परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी शस्त्र तस्कर आल्याचा सुगावा बाजारपेठ पोलिसांना लागताच पोलिसांनी रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सापळा रचून आरोपीस चार गावठी कट्टे तसेच पाच जिवंत काडतूससह जेरबंद केले .

20 रोजी रात्री 10 .30 दरम्यान पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि हरिष भोये सपो.शरीफोहीन काझी व पोलिस कर्मचारी हे स्टेशन स्ट्रीट पेट्रोलिंग करीत असताना पो.नि राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, बस स्टॅंड परिसरात एक शीखलकर इसम डोक्यावर काळ्या रंगाचे दस्तार व दाढी वाढवलेला आणि अंगात पिस्ता रंगाचा शर्ट घातलेला इसम हा पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने परिसरात सापळा रचला.

यावेळी स्टेशन रोडवर रेल्वे हेरिटेज समोर एक शीखलकर इसम आला, त्याचक्षणी त्याला पोलिसांनी जाळयात घेरले. चौकशीत सदर संशयीत आरोपी दिपसिंह गुरुमुखसिंह कलानी (वय 20 रा. तितरान्या पोस्ट हेलापटाव जि.खरगोर म.प्र.) असा आरोपी मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात असलेल्या पांढऱ्या रंगाचा पिशवीमध्ये चार गावठी पिस्टल मिळुन आले व त्याचे जिन्स पॅन्टच्या समोरील डाव्या खिशामध्ये पाच जिवंत काडतुस व मोबाईल व पाठीमागीत खिशात पाकीट मिळुन आले यामध्ये 25,000/-रु.कि.चे एक लोखंडी गावठी कटटा मॅगझीनसह सदर कट्याचे निपवर काळ्या रंगाचे पट्टी असलेला जु. वा. 2125,/-रु.कि.चे एक लोखंडी गावठी कटटा मैंगझीनसह सदर कल्याचे ग्रिपवर काळ्या रंगाचे पट्टी असलेला जु.वा. 3,125,/- रु.कि.चे एक लोखंडी गावठी कटटा मॅगझीनसह सदर कट्याचे निपवर काळ्या रंगाचे पट्टी असुन दोन्ही बाजुस चॉकलेटी रंगाचे स्टार थे चिन्ह असलेला जु.वा. 4125 /-रु.कि.चे एक लोखंडी गावठी कटटा मॅगझीनसह सदर कटयाचे ग्रिपवर पिवळ्या रंगाचे पट्टी असलेला जु वा. 593.500/-स.कि.चे एकुण पाच पितळी जिवंत काडतुस किमत अंदाजे 502,000/-रु.कि.चा एक गोल्डन रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन 71850/-रु.रोख एका काळ्या रंगाचे पाकिटात 1,37,850/- रु.कि.चा मुद्देमाल असे चार गावठी पिस्तल व पाच जिवंत काडतुस आरोपीच्या ताब्यात मिळून आले.

याप्रकरणी पो.कॉ प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सी.सी.टि. एन.एस. गुन्हा रजि.नं. 126/2002 शास्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 1 8 (2) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल आहे.

10 मोबाइलसह आरोपी ताब्यात

तसेच दिनांक 19 फेब्रवारी रोजी सायंकाळी पो.हवा. रमन सुरकर, पोना निलेश चौधरी, पोना उमाकांत पाटील, पो.कॉ प्रशांत रमेश, परदेशी. पो.का. योगेश माळी, पो.का. प्रशांत सोनार असे भुसावळ शहरातील बस स्टॅण्ड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळ्याजवळ गस्त करीत असताना शेख रहीमोद्दीन शेख कमरोद्दीनरा. रजा टॉवर जवळ पापा नगर भुसावळ व शायबाज खान रमजान खान (वय 21 रा. फैजपुर ता.यावल) हे पोलीसांना पाहुन पळुन जात असल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 10 अँड्रॉइड मोबाईल फोन मिळुन आल्याने त्याबाबत त्यांना विचारपुस केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने व त्याच्याजवळ असलेले मोबाईल फोन बाबत कोणत्याही प्रकारे कागदपत्र नसल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन 77,000/-रुपये किमतीचे 10 अँड्रॉइड वेगवेगळे कंपनीचे मोबाईल फोन असे जप्त करुन वरील आरोपीताच्या विरूद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला महा.पो.का.कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंदक्रांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक हरीष भोये, एएसआय शरीफ काझी, हवालदार रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.