सावधान.. भुसावळात लाखोंचा बनावट खवा जप्त

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही देखील बाजारातून खवा आणून खात असाल तर सावधान.. कारण सध्या सणासुदीचे दिवस असून बाजारात बनावट खवा येत आहे. हा बनावट खवा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. भुसावळ येथे गुजरात येथील तब्बल पावणेबारा लाखांचा बनावट खवा पोलिसांनी जप्त मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट खवा परराज्यातून येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलीसांनी तपास सुरु केला. हा मावा गुजरात मधून आणला जात असल्याची खात्री पाेलीसांना पटल्यानंतर संबंधितांवर कारवाईसाठी सापळा रचला.

दरम्यान मुक्ताईनगर मलकापूर विदर्भात आमदाबाद येथून ट्रॅव्हल्समधून 178 बॅग थैलीत ५३४० किलोचा बनावट मावा पाेलीसांनी जप्त केला. त्याची किंमत सुमारे अकरा लाख 874 रुपयांची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पाेलीसांनी संबंधितावर कारवाई करून अन्न औषध पुरवठा विभागाकडे सुपुर्द केला असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.