Nagpur Floods: पुरात अंबाझरीच्या महिलेचा मृत्यू, बचाव कार्य सुरु

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूरमध्ये मुसळधार पावसाने पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली असून, NDRF आणि SDRF च्या तुकड्या मदतीसाठी दाखल झाल्या आहे. पुराचा सर्वाधिक फटका अंबाझरी भागात बसला असून, इथं महिलेचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बचावासाठी लष्कराच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

१४० नागरिक सुरक्षित
फडणवीसांनी नागपूरमधील पुरस्थितीबाबत सविस्तर माहिती देणार ट्विट केलं आहे. त्यानुसार SDRF च्या तुकड्या ७ गटात विभागल्या गेल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. NDRF आणि SDRF या पथकांनी आत्तापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे.

४० मूकबधिर विद्यार्थी सुरक्षित बाहेर
मूक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. नागपूर शहराच्या विविध भागात २ NDRF च्या टीम युद्धपातळीवर बचावकार्यात आहेत. त्याचबरोबर अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात सहभागी आहे.

शाळांना सुटी जाहीर
अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोतल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडून नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे. कोणत्या अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि घाबरून जाऊ नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वृद्ध नागरिकांना सर्व मदत तातडीने देण्याचे निर्देशही फडणवीसांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.