येत्या ४८ तासात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज, जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. नागपूर, नाशिक, भंडारा आणि लातूर या जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. तर, पुढील ४८ तासात राज्यभरात मान्सून सक्रिय होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. रायगड, भंडारा, गोंदिया, गोंदिया नागपूर, नाशिकमध्ये तुरळक ते मुसळधार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची देखील शक्यता पुणे वेधशाळेतील ज्योती सोनार यांनी वर्तवली आहे. दरम्यान, पुण्यातील हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज व्यक्त करतांना येत्या २५ आणि २६ तारखेला राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही सांगितले आहे. तर गणेशोत्सव काळात छत्री आणि रेनकोट घेऊनच बहर पाडण्याचे आवाहन हवामान विभागाजडुन राज्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.