भडगाव येथे कर्कश आवाजाचे डी.जे वाजवुन शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सणोत्सवमध्ये डी. जे, बँड इ.सर्व नियम व अटींचे पालन करुन वापरण्याचे पोलीस प्रशासनाकडुन वारंवार सुचना देवुनही कर्कश आवाजाचे डीजे वाजवुन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुध्द भडगांव पोलीसांनी कारवाई केली आहे.

या बाबत अधिक महिती अशी की,दि. 18/9/2023 रोजी रात्री 10.30 वा. सुमारास भडगांव शहरातील बाळद रोड येथे डी.जे. लावुन मोठया आवाजात विनापरवाना मिरवणुक सुरु असताना मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगांव अभयसिंह देशमुख साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे मिरवणुकीच्या ठीकाणी पोहचले. सदर ठिकाणी एक आयशर गाडी क्र. MH 43 F 8058 हीच्या रचनेत बदल करुन डी. जे.बसवुन विनापरवाना आवाजाच्या डेसीबल मर्यादेचे उल्लंघन करुन डी.जे वाजविताना आढळून आला. म्हणुन सदरची डी.जे ची गाडी भडगांव पोलीस स्टेशनला आणुन पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांनी सदरबाबत परिवहन कार्यालय, जळगांव विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार केला असता त्यांच्याकडून डी. जे. मालक तुषार पाटील व राकेश बाग दोघे रा. भडगांव यांना रुपये 44,000/- रु इतका आर्थीक दंड करण्यात आला असून भडगाव पोलिसांकडून तालुक्यातील व शहरातील गणेश मंडळ तसेच डी. जे. धारक यांना भडगाव पोलीस स्टेशनकडुन सुचना व आवाहन करण्यात येत आहे. सार्वजनिक मिरवणकीमध्ये डी जे वाजविताना वेळेचे व डी जे च्या आवाजाच्या मर्यादेबाबत मा. सुप्रीम कोर्टाने घालुन दिलेल्या नियमांचे व RTOच्या नियमांचे पालन तंतोतंत पालन करण्यात यावे. अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येतील बाबत भडगांव पोलीस स्टेशन कडुन आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.