भुसावळ शहरात युवकाचा खून

0

भुसावळ भुसावळ शहरात एका युवकाच्या खुनाच्या

घटनेने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले असून एका 31 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने छातीवर आणि हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. मात्र त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या घटनेमुळे भुसावळ शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शहरातील खडका रोड परिसरात महादेव मंदिरा जवळ पूर्व वैमनस्यातून रविवारी नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीत चाकूने वार झाल्याचे दिसत असून हातावर वार आहेत. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासणी अंती मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात केलेलाआक्रोश मन हेलावून टाकणारा होता. दरम्यान याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.