पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
डॉक्टर माझ्या कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येतोय, मला ऐकायला कमी येतंय, कान दुखतोय, चक्कर येतेय, अशा तक्रारी घेऊन तरुणाई फॅमिली डॉक्टरांसह कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येत आहे. कारण? विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वपारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर बेधूंद होऊन तासनतास नाचणे, तज्ज्ञांच्या मते आता अशांना काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विसर्जन मिरवणुकीमध्ये दाेन दिवस डीजे आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज प्रचंड घुमला. ताे आवाज दाेन दिवस अगदी ८३ डेसिबलपासून १२९ डेसिबल इतका प्रचंड हाेता. त्यामध्ये तरुणाईने यथेच्छपणे थिरकण्याचा अनुभव घेतला. आता त्याचे दुष्परिणाम देखील भाेगावे लागत आहेत. ऐकायला कमी येण्यासारखे अनेकांना लक्षणे आहे.