Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हिंगोणा परिसरात विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
    गुन्हे वार्ता

    हिंगोणा परिसरात विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 9, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरातील शेती शिवारात असलेल्या गट नंबर १२०३ या शेतात शेत मजूर काम करण्यासाठी गेले असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळे मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.सदरील बाबीची माहिती शेतात काम करणार्‍यासाठी आलेल्या मजुरांनी तात्काळ शेतमालकाला कळविली.प्रसंगी शेतमालकाने सदरिल माहिती हिंगोणा गावाचे पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना फोनद्वारे दिली.यानंतर हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री करून सदरच्या घटनेची माहीती फैजपूर पोलीस ठाण्यात दिली.सदरील माहिती मिळताच फैजपूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले.सदर मृतदेह महिलेचा असून अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकलेली नाही.सदरील महिलेचे वय अंदाजे ४४ वर्ष असुन तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे.याबाबत फैजपूर पोलीसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देविदास सूरदास हे पुढील तपास करीत आहेत

    #bhusawal #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.