पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबीराचे तालुक्यांमध्ये आयोजन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हयातील महिलांनी राज्य शासनाच्या 04 मार्च,2013 च्या शासन निर्णयानुसार समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. सदर महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे तालुका निहाय नियोजन पुढील प्रमाणे.

धरणगाव – 11 मे, 2023, भुसावळ -12 मे,, 2023, रावेर- 16 मे, 2023, मुक्ताईनगर- चाळीसगाव – 17 मे, 2023, जामनेर- बोदवड – 18 मे, 2023, यावल – 19 मे, 2023, एरंडोल –अमळनेर -22 मे, 2023, पारोळ – 23 मे, 2023, चोपडा – 24 मे, 2023, पाचोरा –26 मे, 2023, भडगाव – 29 मे, 2023, जळगाव – 30 मे, 2023

तरी जळगाव जिल्हयातील ज्या महिलांच्या तक्रारी असतील अशा महिलांनी त्यांच्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांचे कार्यालय व पंचायत समिती या कार्यालयांशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावेत व त्याच ठिकाणी भरलेला अर्ज सादर करावा अथवा ज्या विभागाशी निगडीत तक्रार असेल त्या विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना शिबीराचे दिवशी सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.