आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज, रामापेक्षा रावणाचीच चर्चा जास्त!

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

आदिपुरुष (Adipurusha) चित्रपटाबाबत जेवढे वाद झाले ते जगजाहीर आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. जेवढा हा चित्रपट वादात सापडला होता तेवढाच आता तो प्रेक्षकांना पसंतीस पडत असल्याचे समोर येत आहे. सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) पहिल्या रावणाच्या लुकला प्रेक्षकांनी भलतेच ट्रोल केले होते. पण आता चक्क या लूकने प्रेक्षकांना वेड लावल आहे.

विशेष म्हणजे अगदी काही वेळातच या चित्रपटाचे व्ह्यूज मिलियन पार गेले आहे. ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपट बऱ्याच सुधारणा करत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्वच चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला मोठ्या पडद्यावर पाहायला उत्सुक आहे. महत्वाचं म्हणजे यात सैफ अली खानच्या लुक ने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. विशेष म्हणजे एका ट्विस्ट सोबत शेवटी रावणाला दाखविण्यात आले आहे. ज्या पद्धतीने ट्रेलर ला चांगला प्रतिसाद मिळतोय तसाच चित्रपटाला देखील मिळेल का? असा प्रश्न सध्यातरी पडतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.