Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भालोद येथील बौद्ध वस्तीवर हिंसक हल्ला
    गुन्हे वार्ता

    भालोद येथील बौद्ध वस्तीवर हिंसक हल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 28, 2022Updated:December 28, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भालोद येथील महाविद्यालयात हिंगोणाच्या तरुणासोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग आल्याने रावेर तालुक्यातील सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला.

    जवळपास ६० ते ७० लोकांनी अचानकपणे भ्याड हल्ला केल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली. यात अनेक जण जखमी झाले असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. आशुतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला १० ते ११ टाके पडले असून, रोहितची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

    दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद येथील बौद्ध वस्तीवर १) ललित सुनील वाणी २) भूषण नेमाडे (पूर्ण नाव माहित नाही) ३) चेतन सोनवणे ४) प्रशांत सोनवणे ५) हेमंत दिलीप पाटील सर्व राहणार न्हावी. ता. यावल ६) भास्कर चौधरी ७) गणेश उर्फ देवा देवकर राहणार सावदा ता. रावेर ८) कल्पेश पाटील ९) सुनील संतोष चिमणकर १०) पवन सुतार सर्व राहणार कोचुर ता.रावेर ११) भूषण जाधव १२) नीरज झोपे १३) रितेश चौधरी १४) शिवम बाविस्कर राहणार सावदा १५) इंद्रजीत पाटील १६) मयूर भारंबे १७) शुभम भारंबे सर्व राहणार फैजपूर ता. यावल व त्यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० जणांनी हल्ला चढविला. या हल्ल्यांमध्ये आशुतोष अशोक भालेराव (वय २१) तसेच रोहित उर्फ बुबा मधुकर लोखंडे (वय २०) दोघे राहणार भालोद हे गंभीर जखमी झाले. यापैकी रोहित लोखंडे याची प्रकृती चिंताजनक असून ते जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.

    भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्यामध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग आल्याने वरील जातीयवादी मानसिकतेच्या मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाट्या-काठ्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करून अनेकांना जखमी केले. यात रोहित लोखंडे याला डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत करून जातीवाचक शिवीगाळ केला. तसेच वस्तीमधील महिला आपल्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यांनाही मारहाण करून त्यांच्या सोबत अश्लील वर्तन केले.

    आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी हातातील हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेले साक्षीदार सुलभा मधुकर लोखंडे, उज्वला अशोक भालेराव, संगीता रुपेश भालेराव यांना सुद्धा वरील आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारून सुलभा मधुकर लोखंडे यांना लज्जा वाटेल असे कृत्य केले.

    वरील गुन्ह्या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीतांविरुद्ध र.नं २२४/२०२२ भा.द.वि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३५४, ३२३, ३३७, ५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 2016 चे कलम तीन३ (१) ( r) (s) (३) (१) (w) (i) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहे

    Bhalod crime news violent attack Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif