कजगाव लोकनियुक्त सरपंच, नवनिर्वाचित सदस्यांचा माळी पंच मंडळतर्फे सत्कार

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माळी पंच मंडळ भडगाव शहर व महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने कजगाव लोकनियुक्त सरपंच रघुनाथ आण्णा महाजन व कोळगाव, कजगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यसह माळी समाज बांधवांचा सत्कार सोहळा आदर्श कन्या महाविद्यालयात संपन्न झाला.

या सत्कार समारंभासाठी व्यासपीठावर माळी पंच मंडळ अध्यक्ष अनिल महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, महात्मा फुले बहुउडद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भिकन महाजन, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव दीपक महाजन, संचालक विजय महाजन, आप्पा महाजन, विनोद महाजन, सदस्या मीनाताई महाजन, ज्येष्ठ सभासद साहेबराव महाजन, सुनील महाजन, नितीन महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कजगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ अण्णा महाजन, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्यभामा हिलाल चौधरी, कविता चंद्रकांत महाजन, कोळगाव येथील विनायक बळीराम माळी, रूपचंद अशोक महाजन, शितल कपिल महाजन, ज्योती संदीप महाजन, सुनंदाबाई नाना माळी, प्रमिलाबाई भगवान पाटील, सीमा संदेश महाजन यांच्या सह पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेले विजय माणिक महाजन, भडगाव फ्रुट सेल संचालक निवड झालेले दिलीप नारायण पाटील, आदर्श कन्या महाविद्यालयास नवीन रंगमंच वडिलांच्या स्मूर्ती पित्यार्थी बांधून दिल्याबद्दल, प्राचार्य रोकडे यांचा रोटरी क्लब यांच्याकडून नेशन अवार्ड प्राप्त झाल्याने शाल श्रीफळ देऊन सर्व समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पंच मंडळ सदस्यांसह शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य रोकडे, प्रास्ताविक एकनाथ महाजन, आभार प्रवीण निंबा महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.