धक्कादायक; भालाफेक सराव करतांना… भाला थेट डोक्यातच… दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू…

0

 

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शाळेत क्रीडा स्पर्धा सुरू असताना 15 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या डोक्यात भाला लागला. यात गंभीर जखमी होऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हुजेफा डावरे असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. माणगाव तालुक्यातील पुरार येथील आयएनटी हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. या घटनेने गोरेगाव परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

शाळेत तालुकास्तरीय पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. त्या दरम्यान काही विद्यार्थी बाजूच्या मोकळ्या जागेत भालाफेकीचा सराव करत होते. यावेळी हुजेफा याने फेकलेला भाला आणण्यासाठी एक मुलगा पुढे सरसावला. तो भाला परत घेऊन येत असताना मध्यावर आला असता त्याने भाला हुझेफा याच्या दिशेने फेकला.

मात्र, मुलाकडे हुजेफाचे लक्ष नव्हते. त्यामुळे भाला थेट हुजेफाच्या डोक्यात लागला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हुजेफा याला तातडीने गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गोरेगावकर यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.