लेखापरीक्षण नाही तर शेअर्स धारकांची रक्कम गेली कुठे?

0

 

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकरखेड भागीले येथील संत चोखामेळा सहकारी सोया. प्रक्रिया कारखाना उभारणीसाठी कर्जदार शेतकऱ्यांची कापण्यात आलेली रक्कम आणि 203 प्रवर्तक यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याने कारखाना सुरू होणार अशा आशा पल्लवित दिसताच समोर अंधकार दाटून आला अन तब्बल बारा वर्ष लोटली तरी बाराखडीतील एक अक्षर तार कंपाऊंड शिवाय काहीही दिसून येत नाही.

बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेतील कर्जदार शेतकरी यांना वितरित केलेल्या रकमेतून जमा करण्यात आलेल्या संत चोखामेळा प्रक्रिया कारखाना उभारण्याच्या आशा उंचावून आता आपल्या परिसरातील शेतीवर आधारित प्रकल्प सुरू होणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सुद्धा शेअर्स कापून घेण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.

लीज झाली, जमीन संस्थेसह अध्यक्ष राजेंद्र भास्करराव शिंगणे यांच्या नावे सातबाऱ्यावर ओढण्यात आली. तीन दिवसांतच लीज, कोणाची हरकत आणि नोंद प्रमाणित अतिवेगवान झाली. तदनंतर 2023 संपणार? तरीही अजून त्या जागेवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सुरू नाही. कारखाना सुरू नाही म्हणून सदर शेतकऱ्यांना भूलथापा मारून कापलेले शेअर्स नेमके कुठे खर्च करण्यात आले, याची माहिती लेखा परीक्षण च्या माध्यमातून समोर येईल या हेतूने चंद्रकांत खरात या सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकिय जनमाहिती अधिकारी तथा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था बुलढाणा यांना डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे ह्यांच्या अध्यक्षतेखाली र नं बी यु डी /पी आर जी (.ए)/१०४/२००८-०९ संस्था ची लेखा परीक्षण अहवाल माहितीच्या अधिकारात मागितला.

तेंव्हा विशेष लेखा परीक्षक व प्र राठोड यांनी माहिती अधिकाराला जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १सहकारी संस्था बुलडाणा व उपलेखपरिक्षक सहकारी संस्था देऊळगाव राजा या दोन्ही कार्यालयाच्या सदर संस्थेच्या लेखापरीक्षण बाबत माहितीची कोणतीही नोंद आढळून न आल्यामुळे लेखा परीक्षण अहवाल अभिलेख कक्षात उपलब्ध नसल्याचे कळविले असल्याने २०११ मधे दोन हजार पन्नास रुपये एका शेतकऱ्याकडून शेअर्स घेण्यात आलेली रक्कम कोठे आहे? असा प्रश्न देऊळगाव मही येथील शेअर्स धारकांना पडला आहे. सदर कर्जदार शेतकरी हे शेकडोंच्या संख्येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.