गुरांना कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला पकडले… गुन्हा दाखल…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील पाचोरा रोडवरील पॉवर ऑफिस जवळ बोलेरो पिकअप गाडीतून सहा गुरांना कोंबून घेऊन जात असतांना भडगाव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. ही घटना दि.11 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमरास घडली. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी – पो.कॉ. स्वप्नील चव्हाण नेमणूक भडगाव पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगाव शहरातील पाचोरा रोडवर पॉवर ऑफिस जवळ पांढऱ्या रंगाची पिकअप क्र. एम.एच.०४ एफ.पी.१८४५ या गाडीत ६ गुरे वाहतूक करण्याचा परवाना नसताना अवैध रित्या दाटीवाटीने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळाले. यामध्ये एक लाख पंच्यांशी (१८५०००) हजार रुपयांचे सहा गोरे व दोन लाख पन्नास हजार (२५००००) रुपयाची पिकअप गाडी असा एकूण चार लाख पस्तीस (४३५०००) हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहा गुरांना गो शाळेत रवाना करण्यात आले आहे.

या बाबत आरोपी १) रईस खान सईद खान रा. कुर्बान नगर पाचोरा २) शे. सईद शे. बुढण रा. बाहेरपुरा पाचोरा यांच्या विरूद्ध गु. र. न.७०/२०२३ भा. द. वी. कलम ५(अ),(ब),९ तसेच प्राण्यांच्या निर्दयी पणे वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम १९६० चे कलम ११(१)(घ) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम १९९ व मोटर वाहतूक कायदा कलम १३०/१७० प्रमाणे भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सचिन वाबळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.