अश्विनचा निर्णय; गोलंदाजी सोडणार ?

0

 

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कसोटी क्रिकेटची सध्या सर्वत्र धूम सुरु आहे. आधी कंटाळवाणे वाटणारे कसोटी क्रिकेटचे सामने आता शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना खिळवण्यात यशस्वी ठरत आहे. त्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा अखेरचा सामना पार पडला. आणि हा चौथा सामना ड्रॉ झाल्यामुळे भारताने या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवत विजय मिळवला. भारतने ऑस्ट्रेलियावर सलग चौथ्यांदा विजय साजरा केला. परंतु शेवटच्या सामन्यादरम्यान चेतेश्वर पुजाराला दिलेल्या बॉलिंगवरून भारताचा गोलंदाज आर अश्विनने मजेदार ट्विट केले.

https://twitter.com/ashwinravi99/status/1635227163086708741?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1635227163086708741%7Ctwgr%5E84bfde1ba15a3e53830d3e9c745de3d9d210ae6f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fsport%2Fr-ashwin-hillarous-tweet-on-cheteshwar-pujara-bowling-in-ind-vs-aus-4th-test-match-mhpp-848352.html

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीमुळे रटाळवाणा होत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या दोघांना गोलंदाजी करण्याची संधी दिली.

चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या दोघांना गोलंदाजी करताना पाहून रविचंद्रन अश्विनने मजेदार प्रतिक्रिया दिली. डिलिव्हरी स्ट्राईडमधील पुजाराच्या फोटो ट्विट करून त्याला, “मै क्या करू? जॉब छोड डू?” असे कॅप्शन दिले. अश्विनच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चांगलाच हशा पिकला.

दरम्यान न्यूझीलंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात मात दिल्यामुळे भारतीय संघ थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.