कुऱ्हा येथे अवैध मद्यसाठा पकडला ; एलसीबीची कारवाईने खळबळ

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावातील हॉटेल खुशी येथे देशी-विदेशी कंपनीच्या दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकून 38 हजारांचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईने हॉटेलमध्ये अवैधरीत्या मद्य विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल खुशी येथे पथकाने छापा टाकून विनापरवाना अवैधरीत्या दारू विक्री करताना दिनेश गंगाप्रसाद जैस्वाल यास पकडण्यात आले. हॉटेलमधून 38 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देशी कंपनीच्या व विदेशी कंपनीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस नाईक किरण मोहन धनगर, पोलीस नाईक प्रमोद अरुण लाडवंजारी, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख व चालक प्रमोद शिवाजी ठाकूर व कुर्‍हा दुरक्षेत्राचे पोलीस नाईक प्रदीप इंगळे आदींच्या पथकाने केली कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.