भडगावात विविध संघटनांतर्फे चंद्रकांत पाटलांचा निषेध

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी आज भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या घृणास्पद बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सनदशीर लोकशाहीच्या माध्यमातून तहसीलदार मुकेश हिवाळे आणि पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

तत्पूर्वी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली.

महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळेसाठी भिक मागून शाळा सुरू केल्या असे वाचाळ वक्तव्य राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्याचा भडगाव तालुका येथील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

ज्या महापुरुषाने विविध समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असे महान दातृत्व महामानव यांच्याबाबत असे वक्तव्य करणे खरोखरच निषेधार्थ आहे. अशा गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, यापुढे असे कोणीही बेताल वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

या प्रसंगी आरपीआय तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा, महाराष्ट्र माळी समाज महासंघ नाशिक विभागीय अध्यक्ष व पत्रकार सागर शिवदास महाजन, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष आण्णा मोरे, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, मनसे जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ, महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष भिकान महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघ व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष नितीन महाजन, देवराम महाजन, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राहुल पाटील, जाकीर कुरेशी, विनोद अडकमोल, गुरुदास भालेराव, ईश्वर बाविस्कर, देविदास बाविस्कर, चालक मालक संघटनेचे अनिल (जिभाऊ) महाजन, महाराष्ट्र माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष मनोहर महाले, रवींद्र महाजन, राहूल माळी, शामराव पाटिल, दगडू माळी, प्रशांत गालफाडे, उज्ज्वल महाजन, गणेश पाटील, माधव जगताप, विकास महाजन, गणेश माळी, शंकर मारवाडी, भडगाव युवासेना प्रमुख चेतन पाटील, अपंग आघडीचे भरत धोबी, संजय सोनवणे, नाभिक समाज संघटनेचे तालुकध्यक्ष संजय पवार, भरत चव्हाण, भानुदास महाजन कजगाव, एकलव्य संघटनेचे दिनकर सोनवणे, रवींद्र ह्यालींगे, भडगाव तालुका कामगार आघाडीचे परमेश्वर सूर्यवंशी, अबरार मिर्झा, विजय ठाकरे, यश महाजन, राजू महाले, सुदाम अहिरे, राष्ट्रवादीचे हर्षल पाटील, राहूल पाटील, उद्धव ठाकरे सेना गटाचे अनील पाटील, शंकर मारवाडी, मनोहर चौधरी, शिंदे गट सेनेचे निलेश पाटील, महेंद्र ततार, मुन्ना परदेशी, राकेश पाटील, विकास महाजन, शांम महाजन, महात्मा फुले संस्थेचे भिकन महाजन, सौरभ बच्छाव, गोविंद महाजन, अनिल महाजन, प्रकाश महाजन, उमेश जाधव, भुषण ब्राम्हणे, सिद्धार्थ गायकवाड, लहुजी संघर्ष सेनेचे सुभाष पगारे, अखिल भारतीय सेनेचे दिनेश महाजन, जीभू महाजन, विनोद (गब्बर) महाजन, विनोद खेडकर, भैय्या बाविस्कर, संतोष माणिक महाजन, योगेश महाजन, अनिल पाटील, धोंडू राखुंडे, रवी राखुंडे, सुनील फासगे, मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.