खंडाळा घाटात विद्यार्थ्यांची बस उलटली, दोघांचा मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रविवारी रात्री मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटात (Khandala Ghat accident) विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस उलटली आहे.

या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली आणि आजुबाजुच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे विद्यार्थी लोणावळ्यातील एका जल क्रीडा केंद्रात (वॉटर पार्क) सहलीसाठी रविवारी आले होते.

रविवारी रात्री लक्झरी बस क्रमांक एमएच ०४ जीपी २२०४ ही बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. या बसमधून चेंबूर येथील मयांक कोचिंग क्लासेसचे दहावीच्या वर्गातील एकूण ४८ विद्यार्थी प्रवास करत होते. कोचिंग क्लासचे दोन शिक्षकही बसमध्ये होती. ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चेंबूरच्या दिशेनं जात होती. यावेळी घाट उतरत असताना रात्री आठच्या सुमारास मॅजिक पॉईंटजवळ ही बस डाव्या बाजूला उलटली.

या अपघातात जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजुबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेत एक मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बसला बाजूला घेण्यात आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.