भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी

0

गांधीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister of Gujarat) विराजमान झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

या शपथ सोहळ्यात गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री एच. बी. सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांची उपस्थिती होती.

१५६ जागांवर विक्रमी विजय मिळवत गुजरातचा गड काबीज केलेल्या भाजपने भूपेंद्र पटेल यांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवडले. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढत विजयाची सप्तपदी पूर्ण केली. १८२ जागांपैकी १५६ जागा जिंकत भाजपने (Gujarat Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याची जणू सुनामी अनुभवली. मागील वेळी ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या १७ जागाच मिळविता आल्या; तर आम आदमी पार्टीला केवळ ५ जागा मिळविता आल्याने त्यांचा दिल्ली पॅटर्न निष्प्रभ ठरला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.