हृदयद्रावक; दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू…

0

 

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एक अत्यंत दु्र्दैवी घटना घडल्यानं (An unfortunate incident) सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या दीड वर्षांचा मुलगा घरातल्यांची नजर चुकून पाण्याच्या टाकीजवळ गेला आणि त्यात पडला. त्यामुळे त्या दीड वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात घडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत मृत्यू झालेल्या दीड वर्षांच्या बाळाचं नाव प्रियांशू मेहर असं आहे.

सविस्तर वृत्त असे की, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात डोंगरगाव इथं मेहेर कुटुंबीय राहतात. मुलगा खेळतोय हे पाहून तोवर अंघोळ करुन येता येईल, अशा विचाराने आई लगेचच घरात गेली. पण अंघोळ करुन जेव्हा प्रियांशूची आई घरी परतली तेव्हा तिला प्रियांशू कुठेच दिसून आला नाही. तिने  शोधाशोध सुरु केली. इतक्यात प्रियांशूच्या आईची नजर पाण्याच्या टाकीजवळ गेली असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

प्रियांशूचा नळाच्या पाण्याच्या टाकीत कोसळून बुडाल्याने मृत्यू झाला होता. चिमुकल्याचा झालेला करुण अंत पाहून आईला अश्रू आवरता आले नाहीत. प्रियांशूच्या आईने आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी काय झालंय, हे पाहण्यासाठी लगेचच धाव घेतली. प्रियांशूची काहीच हालचाल होत नाही हे पाहून शेजाऱ्याांच्या मदतीने त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे नेईपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर प्रियांशूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. प्रियांशूच्या मृत्यूनं त्याच्या आईवर मोठा आघात झाला आहे. चिमुकल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने फोटडलेला टाहो काळीज पिळवटून टाकणारा होता.

आपल्या लहानग्यांवर विशेष करून छोट्या बालकांवर घरातील एका मोठ्या सद्स्याने नेहमीच लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. जेणेकरून अश्या घटना होणार नाहीत आंनी आपले बालकांसह सर्व सुरक्षित राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.