शेतातून 14 क्विंटल कापूस चोरी; गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील वाडे येथील शेतातील गोण्यांमधे भरलेला 14 क्विंटल कापूस अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना दि. 26 रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील वाडे येथील शेतकरी समाधान महाजन यांच्या शिवारातील (गट नंबर  ११२/१) येथिल शेतातील शेडमधून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रूपये किमतीचा अंदाजे १४ क्विंटल कापूस गोण्यांमध्ये भरलेला प्रत्येकी ५००० रुपये क्विंटल दराप्रमाणे अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याप्रकरणी समधान दयाराम महाजन रा.वाडे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भाग 5 गुरन २९९ / २०२२ भादवी कलम ३८०,४६१, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ पांडुरंग सोनवणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.