सुख-दुःखात सहनशील बना

0

प्रवचन सारांश – 28.10.2022 

‘इष्ट-वियोग अनिष्ट- योग में, सहनशीलता दिखलावे..’ सुख – दुःख कोणत्याही स्थितीत आपण सहनशील असावे. असे आवाहन पु. जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले.

दुःखाचे कारण जाणल्या शिवाय त्या दुःखावर इलाज, उपाय – कसा करता येऊ शकतो. नरकगतीमध्ये खूप दुःख असतात. जो ज्या क्षेत्रात तज्ज्ञ असतो तोच समस्यावर उपाय सांगू शकतो. उपाय – सांगण्यात येतात परंतु जे सांगितले ते प्रत्यक्ष केलेच नाही तर फायदा होणारच नाही, तुम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देत असतो. दुःख  आलेच तर  ‘जीनवाणी’ मध्ये सांगितलेले उपाय आपलेसे करावे. दुःखात शोक करू नये असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले.

जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे, त्यात ‘मेरी भावना’ या रचनेवर आधारीत प्रवचनमाला सुरू आहे. आजच्या प्रवचनाल त्यांनी ‘इष्ट – वियोग अनिष्ट योग में, सहनशीलता दिखलायें या ओळींवर चर्चा केली.  इष्ट-वियोग म्हणजे तुम्हाला’ प्रिय असलेली वस्तु हरवली तर ती वस्तू मिळत नाही तोवर तुम्हाला शांतता लाभल नाही, अनेकदा वस्तू हरवली तर दुसऱ्याला दोष दिला जातो.

एकदा वियोग झाला ते पुन्हा मिळणार नाही. जीवनात – संयोग – वियोग तर होणारच आहे. घरातील वृद्ध व्यक्ती 80 वर्षे पूर्ण केले. त्यांना खूप व्याधी,  त्रास होता, त्यांचा मृत्यू झाला तर तो वियोग जास्त दुःखदायक नसतो. त्या वृद्धांच्या जागी 24 वर्षांचा युवक गेला तर त्याच्या वियोगाचे जास्त दुःखदायक नसतो. ही तर मानवी मानसिकता असते. संसार स्वरूप जाणून वियोगाला सामोरे जावे. अनिष्ट संयोग सुद्धा दुःखाचे कारण असते. घरात दिराणी-जेठाणी यांचे पटत नसेल तर त्यांना वेगळे केलेले बरे. अनिष्ट वियोग या परिस्थितीमध्ये सुख प्राप्त होते.

महापुरुषांच्या चरित्राचा आदर्श घेऊन इष्ट, अनिष्ट परिस्थितीमध्ये कसे वागावे हे जाणून घ्यावे. ६४ सतियांनी कसे दुःख सहन केले. तसेच सती, सीता यांचे चरित्र बघावे.  त्यांची सहनशीलता बघावी, त्यांच्या सहनशीलतेचा आदर्श घ्या असे आजच्या प्रवचनात आवाहन करण्यात आले. अंजना व  पवनकुमार यांची कथा प्रवचनात सांगितली. पवनकुमार यांच्या मनात अंजना बद्दल गैरसमज निर्माण झाला होता. त्या दोहोंचा विवाह झाला. सुख-दुःख असो सहनशील बन अशी शिकवण अंजनाला मिळाली. रात्रभर पती आले नाही. पवनकुमार यांना घरच्या सदस्यांनी समजावले. परंतु ते मानले नाहीत व १२ वर्षे इष्ट वियोग अंजनाने सहन केला.

२९ ऑक्टोबर रोजी ‘ज्ञानपंचमी’ आराधना करावी. एक उपवास, एकासना करावी. ज्ञानपंचमी आराधना केल्याने काय होते? त्याचे विशेष प्रवचन होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.