समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी दोघांना अटक

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून (Ram Mandir) भगवान राम (Lord Ram), देवी सीता (Sita), भगवान लक्ष्मण (Lord Lakshmana) आणि भगवान हनुमानाच्या (Lord Hanuman) पंचधातूंच्या एकूण दहा ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी कर्नाटक (Karnataka) आणि सोलापूरमधून (Solapur) दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या 2 आरोपींकडून हनुमानाच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात झालेल्या चोरीच्या या प्रकरणामध्ये आता ही मोठी अपडेट आहे. चोरी झालेल्या मूर्ती 450 वर्ष जुन्या होत्या. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या चोरी प्रकरणामध्ये काही मूर्तींची विक्री करण्यात आली आहे. तर काही मुर्त्या आरोपींकडून जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या पूरातन मूर्त्या 25 हजारामध्ये विकल्या गेल्याची देखील माहिती समोर आली आहे. 22 ऑगस्टला जालना मध्ये झालेल्या या चोरीचं प्रकरण जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून एसआयटी कडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणाला आता वेग आला आहे.

अटक झालेल्या दोन व्यक्तींपैकी एक आरोपी चोरी प्रकरणामध्ये सामील झाला होता. तर दुसरा आरोपी चोरी खरेदी-विक्रीमध्ये सहभागी होता. अद्यापही मुख्य आरोपी फरार आहे. या फरार आरोपींकडे इतर मूर्त्या असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या याप्रकरणी अधिक पाठपुरावा केला जात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.