जळगावतून अल्पवयीन मुलीला पळविले ; एका विरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- शहरातील शनिपेठ  पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका परिसरातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय  मुलीला  २ रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास संशयित विश्वजीत उर्फ ईश्वर  सपकाळे रा.  कांचन नगर याने पोलीस लावून पळवून  नेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने दिल्यावरून शनिपेठ पोलीस स्टेशनला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.