गुढे येथे मेडिकल दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास

0

भडगाव;- तालुक्यातील गुडे येथे मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतील ड्राव्हर मध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये रोकड आणि इतर मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार २ जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता उघडकीस आला . याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राहुल अनिल महाजन वय 38 हे व्यावसायिक असून त्यांचे मेडिकल दुकानातून अज्ञात-चोरट्याने एक रोजीच्या रात्री दहा ते दोन रोजी च्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर कुलूप तोडून आतील 22 हजार रुपये रोख ,तसेच बाजूच्या गिरणाई मेडिकल मधून दहा हजार रुपये रोख, तीन हजार रुपयांचे चॉकलेट बॉक्स आणि चॉकलेटची बरणी असा एकूण 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.