ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम इस्टिमेट प्रमाणे आहे का ? सुज्ञ नागरिकांचा सवाल

भाग-२

0

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

याबाबत सविस्तर असे की, आपण मागील भागामध्ये कार्यारंभ आदेश तसेच तांत्रिक मान्यता व कामाच्या ठिकाणी बोर्ड न लावणे, या गोष्टी बघितल्यात. आज आपण पाहणार आहोत. ग्रामपंचायत इमारत बांधकामाविषयी या ठिकाणी बांधकामाविषयी सुद्धा साशंकता व्यक्त केली जात आहे. मंजूर नकाशाप्रमाणे तसेच मंजूर इस्टिमेट प्रमाणे या ठिकाणी बांधकामासाठी लागणारी मटेरियल वापरलेले नाही. अशी सुद्धा चर्चा आहे. तसेच बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये दिवसा सुध्दा अंधार पडत आहे. तसेच मोकळी हवा व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश असायला पाहिजे तो त्या प्रमाणात उपलब्ध नाही. एकंदरीतच सर्व काही अलबेल असल्याने कुणालाच काही देणे- घेणे नाही. या सर्व गोष्टी लक्षात येवून सुद्धा तांत्रिक बाबी बघणारे अभियंता यांनी या गोष्टी कशा काय खपवून घेतल्या हीसुद्धा एक मोठी गोष्ट आहे. या बाबतीत सुद्धा नागरिक चर्चा करतांना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.