गोमांस वाहतूक करण्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी चक्क ट्रक पेटवला

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाळधी येथे गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवार रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांबोरी जवळील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी एक ट्रक क्रमांक UP93AT 8135 रात्री थांबला होता. त्यातून दुर्गंधी येत असल्याने जिज्ञासू युवकांनी ट्रक चालकाची विचारपूस केली तेव्हा त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्राला याबाबत माहिती दिली तात्काळ पोलीस कर्मचारी तेथे जाऊन ट्रक पाळधी पोलीस दुरक्षेत्राला आणणे अपेक्षित असताना बायपास जवळ गोडाऊनच्या मोकळ्या जागेत घेऊन जात असताना तरुणांना ट्रक सोडून देत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी ट्रक अडवला यावेळी पोलीस व तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला असता त्या गोंधळात काहींनी ट्रक पेटवला संवेदनशील घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रक पथक दाखल करण्यात आले. या घटनेबाबत पाळधी पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्यात आले.

संशयित आरोपींची नावे भूषण पाटील जनार्दन सोनवणे, गोपाल चौधरी भगवान पाटील, समाधान कोळी विकास सोनवणे, मयूर पाटील, रुपेश माळी, सुशील नन्नवरे, रामेश्वर खलाणे, रत्नदीप नन्नवरे, पंकज चौधरी, अक्षय अहिरे, सागर नन्नवरे, सर्व राहणार पाळधी तालुका धरणगाव, याशिवाय बांभोरी येथील चौघांचा समावेश आहे.

सदर ट्रक मध्ये जनावराची कातळी व रॉ मटेरियल आढळून आल्याने चालक सल्लू खान बाबू खान व मानसिंग कुशवाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पी आय उद्धव ढमाले पाळधी पोलीस दुरक्षेत्राचे एपीआय प्रमोद कठोरे करीत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.