Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»क्रूरतेचा कळस : छेडछाडीला विरोध केल्याने बर्थडेच्याच दिवशी मुलीने एक हात आणि २ पाय गमावले !
    ब्रेकिंग

    क्रूरतेचा कळस : छेडछाडीला विरोध केल्याने बर्थडेच्याच दिवशी मुलीने एक हात आणि २ पाय गमावले !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बरेली – वाढदिवस असल्याने इंटरमध्ये शिकत असलेली तरुण विद्यार्थिनी आंनदात होती. कोचिंग क्लासला गेल्यावर मैत्रिणींसमवेत केकही कापला . मात्र घरी जातांना जणू काही काळ लपून बसला होता. ती येत असताना रस्त्यात एका टवाळखोरांनी तिला घेरून तिची छेड काढायला सुरुवात केल्यानंतर या निडर मुलीने त्यांना विरोध केला मात्र त्या नराधमांनी तिला रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या ट्रेनसमोर फेकले. यात मुलीचे दोन्ही पाय आणि एक हात कापले गेले. ती रक्ताच्या थारोळ्यात रुळावर पडली. त्यात अनेक हाडे तुटली. गंभीर अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.हि क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उत्तर प्रदेशच्या बरेली येथे घडली आहे. सध्या ही मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. ज्यादिवशी मुलीसोबत ही घटना घडली तेव्हा तिचा बर्थडे होता. परंतु नराधमांनी तिला आयुष्यभराच्या वेदना दिल्या.

    मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बरेलीच्या सीबीगंज भागातील आहे. मागील मंगळवारी इंटरच्या विद्यार्थिनीचा बर्थडे होता. त्यामुळे ती खूप आनंदात होती. कोचिंगवरून परतल्यानंतर तिने मैत्रिणींसोबत तिच्या वाढदिवसाचा केकही कापला. त्यानंतर घरी परतताना ती नराधमांच्या अत्याचारांना बळी ठरली. ती कोचिंगवरून घरी जाताना काही टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. जेव्हा या मुलीने त्यांना विरोध केला तेव्हा या मुलांनी मुलीला रेल्वे क्रॉसिंगवरून जाणाऱ्या ट्रेनसमोर फेकले. यात मुलीचे दोन्ही पाय आणि एक हात कापले गेले. ती रक्ताच्या थारोळ्यात रुळावर पडली होती. रात्री ८ वाजता जेव्हा मुलीच्या घरच्यांना याची माहिती मिळाली तेव्हा खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य पाहत तपासाला सुरुवात केली.

    या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलं की, एक मुलगा आमच्या मुलीवर दबाव टाकत होता. एकतर्फी प्रेमातून बळजबरीने तो तिचा पाठलाग करायचा. घटनेच्या दिवशी त्यानेच मुलीची छेड काढली. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक साथीदार होता. आरोपीने मुलीचा पाठलाग केला, मुलगी जीव वाचवण्यासाठी पळाली असेल. तिला ट्रेनसमोर ढकलून दिले. ३-४ महिन्यापूर्वीही मुलीसोबत असाच प्रकार घडला होता. तेव्हा आरोपीच्या घरी तक्रार पोहचली होती परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर हि घटना घडली.

    सध्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांनाही अटक केली आहे. मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्या उपचारासाठी जो खर्च होईल तो सरकार भरणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून पीडित मुलीच्या कुटुंबाला ५ लाखांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे. दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

    #bareli #crime CM Yogi Adityanath
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार

    June 11, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif