सोन्याची ६० हजार तर चांदीची ७० हजारीकडे वाटचाल ; पहा आजचे दर

0

जळगाव ;- इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या भावात जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेसह राज्य आणि देशातील एकूणच सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला मंदीचे वातावरण असतांना तेजी आली आहे .

दिवाळीला अजून महिना भाराचा कालावधी उरला असला तरी आतापासूनच सोने आणि चांदीच्या दराने अनुक्रमे ६० हजार आणि ७० हजार रुपयांकडे मार्गक्रमण सुरु केले असून ते पूर्ण होईल अशी शक्यता याक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे .

बुधवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रामला ५७ हजर ९१० रुपये इतके होते . यात आज गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत सोने प्रति १० ग्रामला ५८ हजार १४० रुपये इतके दर पाहायला मिळाला . कालच्या तुलनेत आज सोनयाच्या भावात २३० रुपयांची वाढ दिसून आली. तर चांदीही वधारली असून चांदीचे प्रति किलो भाव बुधवारी ६९ हजार ४३० रुपये इतके होते . यात आज दिवसभरात ४७०रुपयांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो ६९ हजार ९०० रुपये इतकी भाववाढ पाहायला मिळाली .

Leave A Reply

Your email address will not be published.