बँकेची कामे उरकून घ्या; बँक कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशातील सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा 5 दिवसांचा करावा, अशी बँकांच्या 9 संघटनांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे येत्या 27 जूनला त्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.

देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी या महिन्यात संपावर जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांनी येत्या 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बँकांच्या एकूण 9 कर्मचारी संघटनांनी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

कर्मचारी जर 27 जून रोजी संपावर गेले तर सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. कारण 25 जून रोजी या महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 26 जून रोजी रविवार आहे. त्यात 27 जून रोजी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास सलग तीन दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. त्यामुळे तुमचं काही बँकेचं महत्वाचं काम असेल तर या कालावधीआधीच उरकून घ्या. नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.