बढे पतसंस्थेचे सात संचालक बुलढाणा SID च्या ताब्यात

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   

वरणगाव शहरातील सहकार मित्र चंद्रकांत हरि बढे पंतसंस्थेच्या सात संचालकांना बुलढाणा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर उर्वरीत संचालक शहरातून फरार झाले आहेत.

राज्यभर विस्तार असलेल्या चंद्रकांत हरि बढे पंतसंस्थेच्या बुलढाणा चैतन्य वाडी सावरकर चौक शाखेत सात लाख रुपयांचा घोळ असल्याप्रकरणी पिंताबर चौधरी रा. बुलढाणा  यांच्या फिर्यादीवरून २०१३ मध्ये पोलीसात गु र न  १८१ , भा द. वी कलम  ४०८, ४०६, ४२०, ३४ प्रमाणे महाराष्ट्र ठेवीदाराच्या हित संबधी संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने बुलढाणा, अमरावती  व वाशिम येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सकाळीच शहरात दाखल होऊन चंद्रकात बढे, राजेंद्र चौधरी, भागवत पाटील, बळीराम माळी, भिकु वंजारी, गोविंद माडवगणे, विजय वाघ या संचालकांना वरणगाव पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात  संचालकासह, व्यवस्थापक, लिपिक अशा एकूण २७ जणांवर ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सात संचालक मयत झाले असुन उर्वरीत संचालक फरार झाले आहे.

या कारवाहीमुळे इतर संचालकांचे धाबे दणाणले असुन ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळतील अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. ही करवाही पोलीस उप अधिकक्ष अनिल पवार, उप विभागीय पोलीस अधिक्षक शितल मदणे, पोलीस निरिक्षक शेळके, कुळकर्णी, नाफडे  व अमरावती, वाशिमचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे वीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने काम केले तर सह पोलीस निरिक्षक आशिष अडसुड व उप सह पोलीस निरिक्षक परशुराम दळवी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.