जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील गोरगरिब व भिक्षुक नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्यावतीने अन्नदान करण्यात आले आहे. शंभर अन्नाचे फूड पाकीट वाटून गोरगरिबांच्या पोटाला आधार मिळाला. अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष योगेश पाटील, कुणाल पवार, पंकज चौधरी, प्रदीप नेहते आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.