मनोज जरांगेंच्या सभेनिमित्त वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाण्यात उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गडकरी रंगायतन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी पोलीस दल सज्ज झाले असून रस्ते वाहतुकीस बदल करण्यात आले आहे.

आज पोलिसांकडून सभेच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. तसेच योग्य सूचना आयोगाला दिल्या आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे. तर सखल मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक कार्यकर्त्यांना आयकार्ड देखील दिले जाणार आहेत.

मंगळवारी सकाळी मनोज जरांगे पाटील येणार असल्यामुळे वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. शांततेच्या माध्यमातून सभा झाली पाहिजे अशा सूचना आयोजकांना पोलिसांनी दिल्या आहे. कार्यक्रम शांततेत व्हावा आणि कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी आयोजकांमधील कार्यकर्त्यांना आयकार्ड देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळच्यावेळेस सभा असल्यामुळे वाहतुकीस काही बदल करत नागरिकांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. उद्या होणाऱ्या सभेसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताच्या मार्गात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील सभेच्या मिरवणुकीसाठी वेळेस वाहतूकीत बदल केले आहेत.

रॅलीचा मार्ग – खारेगाव टोल नाका – माजिवडा – पाचपाखाडी – राम मारुती रोड – तलावपाळी – चिंतामणी चौक – गडकरी रंगायतन हा मार्ग आहे. मूस चौक ते गडकरी रास्ता बंद करण्यात आला आहे. गडकरी सर्कलचा रस्ता देखील बंद केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.