राजधानी दिल्लीत भीषण अपघात, ४ पादचारी गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजधानी दिल्लीतून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव बीएमडब्ल्यू करते पार्किंगमधील एका कारसह चौघांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चौघांना एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण दिल्लीमध्ये कैलास एन्क्लेव-२ परिसरात काल रात्री एका भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पार्क केलेल्या वाहनाला मागून धडक दिली. ज्यात ४ पादचारी गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, यशवंत नलावडे (वय, ५८), देवराज मधुकर(वय ५०), मनोहर (वय, ६२) आणि नितीन अशी जखमींची नावे आहेत. हे चारही जण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी हा अपघात झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.