जळगावच्या तरुणाचा आढळला रेल्वेमार्गावर मृतदेह

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भादली-जळगाव उप रेल्वे लाईनवरील रेल्वेमार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक सुकलाल सोनवणे (२४, रा. पवननगर, जळगाव) असे त्या तरुणाचे नाव आहे. दीपक हा तरुण आई, वडील व भावासोबत शहरातील कांचनगरात वास्तव्यास आहे. कटलरी व मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी(ता. १२) दुपारी बाराला दीपक कामानिमित्त घरातून बाहेर निघून गेला होता.

दरम्यान भादली ते जळगाव अप रेल्वे मार्गावरील खांब क्रमांक ४२०च्या २६ ते २८ च्या दरम्यान सोमवारी (ता. १३) मध्यरात्री दोनच्या सुमारास दीपक सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. लोको पायलट रामेश्वर प्रसाद यांनी ओकीटॉकीवरून शनिपेठ पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलीस नाईक रवींद्र पाटील, पॅरिस जाधव, मुकुंद गंगावणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.