तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावणार, काय आहे प्रकरण ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार असल्याची चित्र दिसत आहे.सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमध्ये भाग घेऊ नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. या संदर्भात बच्चू कडू हे  सचिन तेंडुलकर यांना वकिलांमार्फत नोटीस बजावणार आहे. 30 ऑगस्ट रोजी बच्चू कडू ही नोटीस तेंडुलकर यांना पाठवणार आहे. तसेच  वकिलांमार्फत नोटीस पाठवल्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा करू, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू.. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरात माघार घेतली नाही, तर त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करणार आहे. सचिन तेंडुलकर भारताचा अभिमान आहे. त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळं ऑनलाइन गेमबाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे. ऑनलाइन गेम जाहिरातीतून तेंडुलकर यांनी बाहेर पडावं, अशी आमची मागणी आहे. त्यांनी आमची मागणी ऐकली नाही तर आम्हाला यावर वेगळा मार्ग शोधावा लागेल. तसेच सचिन तेंडुलकर यांनी आमचं ऐकलं नाही तर प्रहार स्टाईलनं आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करू”, असं बच्चू कडू म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.