पोटाच्या मुलीला बापाने बनवला वासनेचा बळी, शारीरिक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईजवळील नालासोपारामध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका नराधम बापानेच आपल्याच पोटच्या मुलीला वासनेचा बळी बनवलं आहे. मुलीला बदनामीची धमकी देत नराधम बापाने तिच्यावर सातत्याने अत्याचार केला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईनेच धाडस दाखवून पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तीन महिन्यांपासून क्षयरोगाने त्रस्त असलेली पीडित तरुणी नालासोपारा पश्चिममध्ये आपल्या वडिलांसोबत राहत होती. ती क्षयरोगाने त्रस्त आहे. हे तिच्या वडिलांना माहित होते. तरीही तिच्यावर तो सातत्याने अत्याचार करत होता. गंभीर बाब म्हणजे त्या तरुणीची प्रकृती ढासळत असतांनाही हा प्रक्रर सुरूच होता. गंभीर आजाराने त्रस्त आणि नराधम बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या पीडित तरुणीला ११ नोव्हेंबर रोजी जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेला वाचा फूटली.

मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा रस्ताही नालासोपारा पोलिसांकडे झालेल्या प्रकारची तक्रार केली. नराधम बापाच्या मारहाण आणि शारीरिक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपी वातावर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.