नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांना अनेक नियम आणि अटी ठरवून देत असते. मात्र त्या नियमांचे उल्लंघन झाल्यास RBI कडून संबंधित बँकांना मोठा दंड ठोठावला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेअॅक्सिस बँकेला 90.92 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सांगितले की, काही नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय आरबीआयने मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवर 42.78 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. RBI ने सांगितले की, KYC चे उल्लंघन केल्यामुळे Axis बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
अॅक्सिस बँकेवर आरोप
काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची ओळख आणि त्यांचे पत्ते यांच्याशी संबंधित नोंदी अॅक्सिस बँकेने ठेवल्या नाहीत असे आरबीआयच्या तपासात आढळून आले आहे. यासोबतच बँकेकडून काही ग्राहकांना सतत कॉल करण्यात येत होते. काही ग्राहकांना रिकव्हरी एजंट्सनी केलेल्या कॉलचे रेकॉर्डिंग बँकेने ठेवले नाही. त्याच वेळी, चालू खाते उघडताना ग्राहकाकडून घोषणापत्र घेतले नाही.
Axis बँकेवरील ही कारवाई नियमांचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे. आरबीआयने अॅक्सिस बँकेला नोटीस पाठवून कारणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. आरबीआयने बँकेला विचारले की जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याने बँकेवर दंड का लावला जाऊ नये.
मणप्पुरम फायनान्सलाही दंड
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, मणप्पुरम फायनान्स लिमिटेडला 42.78 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या – सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट नॉन-डिपॉझिट टेकिंग कंपनीज आणि डिपॉझिट टेकिंग कंपनीज (रिझर्व्ह बँक) निर्देश 2016’ च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 42.78 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.