रुग्ण महिलेचा वॉर्डबॉयकडून कडून विनयभंग !

0

जळगाव, लोकशाही निज नेटवर्क

जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण महिलेचा वॉर्डबॉयकडून कडून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सदर महिलेच्या पतीने मोबाईलमध्ये शूटिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील खासगी श्री संतुलन हॉस्पिटलचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. दरम्यान १४ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्डबॉय निलेश ज्ञानेश्वर बाविस्कर (रा. कांचन नगर, जळगाव) याने काहीही आवश्यकता नसताना महिलेस लाज वाटेल असे कृत्य करत विनयभंग केला. सादर प्रकरणानंतर पीडितेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून संशयित वॉर्डबॉय नीलेश बाविस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइलमध्य केला व्हिडीओ
संशयित वॉर्डबॉयच्या हालचालींवर संशय आल्याने महिला उपचार घेत असताना मोबाईलमध्ये त्याच्या हालचालींचे व्हिडिओ चित्रित झाल्यावरून या गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याची दखल घेत गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.