“हा छगन भुजबळ स्वकष्टाचे खातो”, जगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी एकत्रित येतो आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा झाला या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत मनोज मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना प्रश्न केला होता. कुणाचं खाताय? अरे तुझं खातोय का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

छगन भुजबळ यांचं उत्तर
“हा छगन भुजबळ स्वकष्टाचे खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही.” असे छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घर, दार, जाळली नाहीत.

ओबीसी आरक्षण घटनेनुसार आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. ओबीसी सर्व जाती कायद्याने आल्या. तेव्हा आम्ही विरोध केला आहे. मात्र मराठा समाज अवैध्यरित्या ओबीसी समाजात घुसतो आहे. असे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले, “EWS तून मराठा समाजाला जो लाभ मिळतो. तो लाभ ओबीसींना देखील मिळत नाही. मराठा समाजाला १०-११ कोटी मिळतात मात्र ओबीसी समाजाला हजार कोटी देखील मिळत नाहीत. EWS चा ८५ टक्के मराठा समाज लाभ घेतोय.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.