जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील बस स्थानकातून नंदुरबार बसमध्ये चढतांना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोट चोरल्याची घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
मानसी राकेश पाटील (रा. खवशी) या नंदुरबार येथे नातेवाईक मयत झाल्याने त्याठिकाणी जाण्यासाठी आज सकाळी ११ वाजता बस अथानकावर आल्या. १२ वाजता नंदुरबार बसमध्ये चढत असतांना त्यांची ४२ हजारांची पोट अज्ञात चोराने नेली. याबाबत मानसी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार चंद्रकांत पाटील पुढील तपास करत आहे.