औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा, वाचा सविस्तर

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

औरंगाबाद मधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा तुफान राडा बघायला मिळाला आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियिजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत (Uday Singh Rajput) यांनी आपल्याला निधी मिळाला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.  यावरून मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने, शाब्दिक वाद वाढत गेला व त्यांनतर विरोधी पक्षनेते आंबादास दानवे (Ambadas Danave) यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे व सत्तार यांना सुनावले. यावरून थेट हमारीतुमरी झाली व हा वाद एवढा वाढला की एकमेकांच्या अंगापर्यंत जाऊन पोहोचला.

मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखीनच पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हाच वाद औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. कारण यावेळी शिंदे गटाचे मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यात राडा पाहायला मिळाला. निधी वाटपावरून ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीत प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांना उत्तर दिले. या वादाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.