`टेक्नोसेव्ही आणि टेक्नोस्नेही बनणे काळाची गरज`- प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

0

जळगाव;- आजच्या काळात टेक्नॉलॉजी आत्मसात करणे अत्यावश्यक बाब बनली असून टेक्नोसेव्ही आणि टेक्नोस्नेही बनल्यास प्रशासकीय कामकाजात गती आणि सर्वांगीण प्रगती येते असे प्रतिपादन प्रा. व्हि. एल. माहेश्वरी, कुलगुरु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी केले.

विद्यापीठात कर्मचा·यांची सहकारी पतपेढीच्या वार्षीक सर्वसाधरण सभेत विविध टेक्नोसेव्ही सुविधांचे उद्घाटन कुलगुरु प्रा. व्हि.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटन संबोधनात प्रा. माहेश्वरी पुढे म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वापर विविध क्षेत्रात वाढत आहे, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानापासून दूर न जाता तंत्रस्नेही बनल्यास आपण अधिक गती आणि प्रगती करु शकु. पतपेढीने आपल्या कामकाजात टेक्नोसेव्ही सुविधा सुरु करुन गतीमान जनसंपर्काकडे वाटचाल केल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळास व सभासदांस शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी प्र-कुलगुरु, प्रा. एस. टी. इंगळे यांनी गुणवंत विद्याथ्र्यांना प्रेरक मार्गदर्शन केले. डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, सीए रविंद्र पाटील, वित्त व लेखाअधिकारी यांचेही समायोचित संबोधन झालीत. कार्यक्रमास पतपेढीचे डॉ. महेंद्र महाजन, अध्यक्ष, डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्ष, श्री. अरुण सपकाळे, सचिव, श्री. राजू सोनवणे, श्री. अशोक पाटील, श्री. संजय ठाकरे, श्रीमती वैशाली शर्मा, सौ. जयश्री देशमुख, डॉ. दिनेश लाड, डॉ. अनिल लोहार, आदि संचालक मंडळ उपस्थित होते. तदनंतर पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ.महेंद्र महाजन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत गुणवंत विद्याथ्र्यांना पारीतोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

नेत्र व दंत तपासणी शिबिर:

याप्रसंगी जळगाव पिपल्स को-ऑप बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित, प्रभाकर पाटील नेत्रालय, यांच्या सहकार्याने विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांची नेत्र आणि दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. प्रा. व्हि.एल. माहेश्वरी, कुलगुरु, श्री. अनिकेत भालचंद्र पाटील अध्यक्ष, दि. जळगाव पिपल्स को ऑफ बँक लि. जळगाव, डॉ. चंदन चौधरी, नेत्र रोग तज्ज्ञ, डॉ. भाग्यश्री बडगुजर, दंत तज्ज्ञ यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पिपल्स बँकचे मुख्य शाखेचे श्री. मिलींद जोशी,सहायक व्यवस्थापक, श्री. गोविंद खांदे, जनसंपर्क अधिकारी, श्री. अनिल वाणी, कर्ज विभाग प्रमुख, सौ. चित्रा चिरमाडे, व्यवस्थापक, संतोष नवगाळे, महाव्यवस्थापक शाहु रुग्णालय, श्रीमती तरन्नुम शेख, विभागीय सहायक व्यवस्थापक आणि मुख्य शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.