गतिमंद मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील एक २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याने ती तीन महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील एका भागात राहणारी २१ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई व भाऊसह वास्तव्याला आहे. ती गतिमंद असल्यामुळे ती घरीच असते. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी ती महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती सांगितली. अल्पवयीन मुलगी ही अविवाहित असून तिच्या गतिमंदचा फायदा घेऊन आज्ञात व्यक्तीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडल्यानंतर तिच्या आईने पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.