धक्कादायक; मनसेचे नेत्यांवर अज्ञातांकडून झाला हल्ला, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाह न्यूज नेटवर्क

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) मैदानात ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यांना हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), अमित ठाकरे (Amit Thackeray), भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane), संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सदा सरवणकर यांच्याकडूनही त्यांच्या प्रकृतीची भेट देऊन विचारपूस करण्यात आली.

आता संदीप देशपांडेंना रुग्णालयातून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, आम्ही कोणाला भीक घालत नाही. यापाठिमागे कोण आहेत, हे मला माहित आहे. आम्ही त्यांना घाबरणारे नाही. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केलेले हल्लेखोर चेहऱ्याला मास्क लावू आलेले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत पोलिस तपासातच अधिक माहिती समोर येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.