“एम सी स्टॅन” कि तो निकल पडी, लवकरच किंग खान सोबत करणार चित्रपट…!

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

“एम सी स्टॅन”च्या बाबतीत, ‘उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाड के’ असं म्हटल तर वावग ठरणार नाही. कारण बिग बॉस नंतर एम सी स्टॅन काही ना काही विक्रम रचत आहे. या लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने काही मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहे. आता एमसी स्टॅनला खूप मोठी ऑफर मिळाल्याची माहिती समोर येत आहे. गायन क्षेत्रातनंतर एमसी स्टॅन अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला मोठा ब्रेक मिळाला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी चित्रपटातील भूमिकेची ऑफर त्याला मिळाल्याचं कळतंय. शाहरुख खानच्या ‘जवान’ (Jawan)या चित्रपटातील ही भूमिका आहे.

एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी ही सर्वांत आनंदाची बातमी आहे. कारण बॉलिवूडच्या ‘पठाण’सोबत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र याबद्दल एमसी स्टॅनकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र या चित्रपटात तो अभिनय नव्हे तर रॅप करणार आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे एमसी स्टॅनला अभिनयाची ऑफर मिळाली आहे की गायनाची, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.