मराठीच्याच पेपरला कॉपी, ९ प्रकरणांची नोंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इयत्ता १०वीच्या परीक्षेला २ मार्च सुरुवात झाली असून, परीक्षा सुरु होताच कॉपी करण्याचे प्रमाणही वाढलेले लक्षात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेत काल पहिलाच मराठी भाषेचा पेपर होता. यामध्ये एकूण कॉपीच्या ९ प्रकरणांची नोंद झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेत काल पहिलाच मराठी भाषेचा पेपर होता. यामध्ये एकूण कॉपीच्या ९ प्रकरणांची नोंद झाली आहे.

कोविडच्या दोन वर्षांनंतर आता परीक्षा सुरळीत सुरू झाल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कॉपी करूनये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महसूल विभागाकडून बैठ्या पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. यंदा १० वी परीक्षेला महाराष्ट्रातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.