भरदिवसा सहायक फौजदारावर फायटरने हल्ला

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ (Bhusawal) शहरात भरदिवसा सहायक फौजदारावर (Assistant Police Officer) फायटरने हल्ला (Attack by fighter) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सहायक फौजदार जिजाबराव पाटील हे आपल्या दुचाकीवरून जात असतांना त्यांच्या दुचाकीसमोर एक जण अचानक आला. यावर पाटील यांनी त्याला पाहून चालत जा असे सांगितले. यानंतर त्या तरुणाने अचानक फायटरने त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. या तरुणाचे नाव सोनू पांडे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सदर घटना शहरातील वसंत टॉकीज परिसरामधील महाराणा प्रताप चौकात २१ नोव्हेंबर रोजी घडली. जिजाबराव पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.