वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

0

सोलापूर : नांदेडमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सोलापुरातील आपल्या राहत्या घरात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या ही कामाचा ताण व वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली. या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा पोलीस दलातील कामाचा

ताण आणि वरिष्ठांचा जाच यासंदर्भात अनेक प्रश्न उभे केले आहेत, त्यासाठी त्यांनी लिहिलेली आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी बोलकी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची बझार पोलीस ठाण्यात नोंद झाली.

गेल्या महिनाभरापासून आजारी रजेवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून चेऊन आयुष्य संपवले. ही घटना आनंद मळाले यांच्या राहत्या घरात पहाटे चारच्या सुमारास घडली. एका प्रकरणाचा तपास करून पोलीस मुख्यालयाकडे परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात जबडा फाटल्याने नांदेड येथे उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता सोलापुरात पाठवण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ते घरीच उपचार घेत होते. परंतु ते सातत्याने तणावात असल्याचे दिसून येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याने आता कुटुंबीयांनी वरिष्ठांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे.

त्या चिठ्ठीतून कुटुंबवत्सल असल्याने परिस्थितीपुढे हात टेकल्याचे दिसले. यात त्यांनी वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाबाबत आपल्या भावना मांडल्या आहेत. आनंद मळाले यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीने उपचारार्थ त्यांना सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ही वार्ता कळताच सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. कामाचा ताण व वरिष्ांकडून होत असलेला आरोप यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने सपोनि आनंद मळाले यांनी गोळी झाडून जीवन संपवले. त्यामुळे दोषी अधिकान्यावर कारवाई झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. आनंद मळाले हे मूळचे सोलापूरचे. पण सध्या नांदेड येथे कार्यरत होते. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्षे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पाहिले होते.. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार याठिकाणी सेवा बजावली. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. बिलोली पोलीस ठाण्यात नेमणुकीवर आल्यावर वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीयदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठवणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे वांसारख्या गोष्टी त्यांच्याबाबतीत सातत्याने घडत आहेत, अशी त्यांची धारणा होती. वरिष्ठांकडून मदत न होता सातत्याने त्रास होत होता. गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा, दिरंगाई, आरोपीला मदत होईल असे कार्य केले म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, त्यामुळे ते निराश झाले होते. ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचा आहे ऋणी

‘बॅचमेट’ विषयी चिठ्ठीत लिहिले आहे की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्या पश्चात पत्नी व माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये, ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे

Leave A Reply

Your email address will not be published.